का असे ?
का असे ?
शब्द स्तब्ध झाले
मन बेचैन इमाले,
सारी स्वप्ने धुळीला मिळाल्यासारखे वाटते,
सारे जग थांबल्यासारखे वाटते.
का ही खेळी अशी खेळतो आयुष्याशी???
की संपूर्ण जग थांबल्या सारखे वाटते,
सारी स्वप्ने धुळीला मिळाल्यासारखे वाटते....
जेव्हा कधी मन धाडस करे नवे स्वप्न पाहण्याचे,
यशा ऐवजी , अपयशाच्या दिशेने वळते सारे..
भुतकाळ विसरून जेव्हा उभे रहाते नव्याने,
ठेच लागुनी, खचले जाते आयुष्य सारे...
जेव्हा कधी विश्वास ठेवावा वाटतो तुझ्यावर
विश्वासघातच पदरी पडतो माझ्या.
कसा ठेवू मी नव्याने विश्वास तुझ्यावर,
जेव्हा अविश्वासाची भावना कोरली गेली माझ्या मनावर..??
