आठवण तुझी
आठवण तुझी
ना जाणे कोण, काय होऊनी गेल मला?
स्वर कानी नाही पडले तूझे जेव्हा..
सारे जग सूने वाटू लागले,
मन बेचैन होऊ लागले....
प्रत्येक क्षण फक्त तूझ्याच आठवणीत जातो,
दूर राहुनी सुद्धा तुझा स्पर्श जाणवतो..
तुझ्याच आठवणीत गुंतलेले मन माझे,
दूर राहुनी तुझ्या पासून मला जाणविले..
किती प्रेम करते तुझ्यावर ,
वेडे मन माझे...

