आठवणी
आठवणी
किती सुंदर होत्या त्या लहाणपणीच्या आठवणी!
भातुकलीच्या खेळामधले राजा-राणी,
पाण्यामध्ये सोडलेल्या कागदाच्या नावी.
बाहुला - बाहुलीची लावलेली जोडी .
किती सुंदर होत्या त्या लहाणपणीच्या आठवणी,
आईच्या हाताने भरवलेला मायेचा घास
जेवल्यावर तिच्याच पदराला पुसलेला हात.
बाबांकडे खेळण्यासाठी केलेला अट्टाहास.
आईने जवळ घेऊन मांडीवर थोपटणे,
दमलेल्या बाबाने घोडा - गाड़ी होऊन फिरवणे.
किती सुंदर होत्या त्या लहाणपणीच्या आठवणी,
शाळेच्या पहिल्या दिवसाला आई - बाबांची करंगळी
घट्ट धरुन रडणे,
आईचा गोड पापा गालावर तर बाबांनी दिलेले चॉकलेट
हातावर पडताच, गालावर गोड हसू उमटणे.
किती सुंदर होत्या त्या लहाणपणीच्या आठवणी,
काॅलेजला मात्र गेल्यावर बाबांकडे ब्रांडेड बाईक
व स्मार्ट फोन साठी हट्ट करणे ,
घरातून बाहेर पडताना आईला मस्का लावून १०० ची
नोट काढणे.
कॉलेजची मौज - मजा करून झाल्यावर
आयुष्य वेगळ्या वळणावर वळते.
कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव होताच,
बाबांनी गाळलेल्या घामाची व आईने
राबवलेल्या हातांची जाणीव होते.
लहाणपणीच्या सर्व आठवणी मागे सारत
आयुष्य फक्त आणि फक्त जबाबदार्या पार पाडण्यात
व कष्ट करण्यात झुंबते......
