तु आणि मी
तु आणि मी
पाहता क्षणी तुला वाटले असे,
जन्मों - जन्मांचे आपुले नाते जसे..
बोलताना तुझ्याशी ,माझे मला न कळे काय झाले,
मन माझे वेडे मला सोडूनि तुझिया दिशेकडे वळले...
पाहता क्षणी तु माझिया डोळ्यांत,
लाजेने झुकले आणि तुझ्यात गुंतत गेले...
तुझ्या पहिल्या भेटीची ओढ,
आसुसलेले मन, जीवाला लागलेली घोर...
नकळत पणे तुझे माझे मिलन झाले,
पाहताक्षणी तुला, मन माझे तुझे होउनी गेले..
नकळत घडलेल्या भेटीचे स्वरूप एका गोड नात्यात बदलले,
तुझे आणि माझे डोर आयुष्यभरासाठी बांधले गेले ...
जगातील सर्वात सुंदर नाते, आपूले हे बांधले गेले,
नकळत पणे का होईना, मी तुझिया प्रेमात पडत गेले....
वचन आहे तुला माझे, आयुष्यभराच्या साथीचे
प्रत्येक पाऊलावर तुझ्या, असेन मी सावली प्रमाणे..!

