सगळेच परके
सगळेच परके
सगळेच इथे परके आपण
कोण कुणाचं खायला आलोत
स्वतःच्याच पोटासाठी
परक्या शहरात जगत आहोत......
आई, वडील, बहीण, भाऊ
दूर आहेत सर्वच नाती
मिळून जपले बंधुत्व तर
एकतेचे उगवेल मोती........
छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी
कशाला वाढवावे वाद
सामंजस्याने सुटतील कोडे
असे शब्दात घालावे साद.........
आम्ही काय तुम्ही काय
सगळेच जाणार एकदा वरती
कसले शर्यत कसले तंटे
सोडावे लागेल कधीही धरती......
मानवाचे जन्म लाभले
जिवंत क्षणी होऊ द्या कीर्ती
मरणानंतर कोण स्मरतो
फोटोला चढलेल्या हाराची मूर्ती......
मी पणाच्या गर्वाने आजवर
कुणाचे भले झाले
लाखो अरबो करोडपतीचेही
देवाच्या मर्जीपुढे काहीच नाही चालले.....
