STORYMIRROR

Pravin Dongardive

Abstract

4  

Pravin Dongardive

Abstract

जीवनातला खेळ

जीवनातला खेळ

1 min
528

आता या नव्या दुनियेत 

बदलावं म्हणतो थोडं 

तेव्हा कुठेतरी सुटेल

माझ्या जीवनाचं कोडं 


मतलबी या दुनियेत 

माझे कुठेच नाव नाही 

विसाव्याला रोज इथे 

हक्काचे एकही गाव नाही 


इमान राखतो रोज इथे 

पण जिंदगीत भाव नाही 

वेदनेत विव्हळतो कितीदा 

साधा घावही दिसत नाही


स्वप्न देतात आश्वासने 

आयुष्य प्रितीत जगण्याची 

कर्तव्य देतात रोज सल्ले 

जीवन रीतीत जगण्याची 


मी नसतो तिचा कधी 

माझ्यासाठी असते माझी ती 

जाणून घेत नाही कधी ती 

माझ्या मनातली फजिती ती 


कळेल तिला सारंकाही 

जेव्हा निघून जाईल वेळ

सोपा नसतो काही या 

जीवनातला सारा खेळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract