STORYMIRROR

Pravin Dongardive

Others

4  

Pravin Dongardive

Others

प्रेमाची दीक्षा

प्रेमाची दीक्षा

1 min
311

माझ्यासाठी प्रेम म्हणजे

धर्म, पंथ आणि जात आहे

म्हणूनच तर प्रेमाचे गीत

मी अखंड गात आहे

प्रेम जगवते स्वप्नांना

प्रेम म्हणजे

स्वप्नांनी सजलेली रात आहे

दीक्षा घेवून बघ प्रेमाची

प्रेमात जगण्याची

एक अनोखीच बात आहे

होतील इथे जातीजातीत दंगली

प्रेमात कुठे दंगल आहे

जग जिंकता येते प्रेमाने

प्रेमातच या जीवनी मंगल आहे

म्हणूनच फाटक्या झोळीत माझ्या

घेतली मी प्रेमाची भिक्षा

नव्या युगात या जगात

घेतली मी प्रेमाची दीक्षा


साहित्याला गुण द्या
लॉग इन