STORYMIRROR

Pravin Dongardive

Others

3  

Pravin Dongardive

Others

वृक्षाचे जीवनगाणे

वृक्षाचे जीवनगाणे

1 min
234

मी उभा वृक्ष येथे,

वेदनांचे घाव झेलतो आहे.

अरे देवून तुम्हा सावली,

मी उन्हात तळमळतो आहे.

करून घाव त्या कुठारीचे,

मी तीळ-तीळ मरतो आहे.

करून माझ्या देहाचे तुकडे,

अन आनंदी होतात कसे तुमचे मुखडे.

वाचवा रे तुम्ही मला,

मी तुम्हाला वाचवतो आहे.

लपवून माझी आसवं,

मी जमिनीत ती साठवतो आहे.

मी दिलेत तुम्हाला फुले फळे,

पदरही धरला डोक्यावर मायेचा.

तरी का छळता मला,

सरणासवे तुमच्या का जाळता मला?

गाडीत त्या जेव्हा माझे सरण चालले,

कंठात थोडा जीव होता,

माझ्याच जातीचा रस्त्यात त्या उभा,

माझाच जिवाभावाचा सखा होता.

जाता-जाता निरोप माझा घेत होता.

चल दोस्ता जातो आता,

देहात माझ्या प्राण नाही.

आपल्या ह्या उपकाराची,

ह्या मतलबी माणसांना जाण नाही.

तो हि दु:खात म्हणाला,

जावू दे माफ कर ह्या माणसांना.

त्यांना अजून आपली किंमत नाही.

त्यांना हवं तसं जगू दे,

निसर्गाचा हा असमतोल,

त्यांच्याच डोळ्यांनी बघू दे.

तरच कळेल त्यांना आपली किंमत.

जा दोस्ता असेच आपले जिणे आहे.

वाऱ्यासोबत विरणाऱ्या मुक्या शब्दांचे,

हेच आपले जीवनगाणे आहे.


Rate this content
Log in