शृंगार
शृंगार
रोजच पाहतो तुझा
चेहरा आज वाटे नविन काही
शृंगाराची खाण तुझी
नजरेचा बाण घायाळ करी
कमरेवरचा हात तुझा
नजर झुकतीत किंचित खाली
ओठांवरती चमकते लाली
हा शृंगार कुणासाठी
नटली अशी, जणू भासते नटी
उतावीळ झाला जीव तुला भेटण्यासाठी
मधाळ तुझे ओठ
त्यावर ठेवून अलगद बोट
इशारा करशी मज काही
पैंजणांचा नाद मधुर
असा वाजतो तुझ्या पायी
चाल तुझी जणू चालली वाघिण
डुलते मान जशी डुलते नागिन
कुणास मी काय बो
नजरा तुझ्यावर हजार आहेत
तुझ्या शृंगाराची नशा
आज प्रत्येकाच्या नजरेत आहे

