STORYMIRROR

Pravin Dongardive

Tragedy Others

4  

Pravin Dongardive

Tragedy Others

जीवनगाणे गातचं राहायचं

जीवनगाणे गातचं राहायचं

1 min
190

राजकारण्यांची फसवी 

आणि पोकळ आश्वासने 

यावरच जगत राहिला तो 

एक पाय तळ्यात अन 

एक पाय मळ्यात ठेवून 

नुसते मोर्च्यात नारे देवून 

खंगून गेला तो कधीचा 

राजकारण्यांच्या दिंडीत 

आता पाउल काही थांबेना

उध्वस्त वावरातही 

मन काही रमेना 

दारिद्र्यानही केल्यात 

खोल जखमा जिवंत काळजात

नुसताच शेतकरी राजा

पण दररोज त्यांन किती 

गुलामाचं जीनं जगायचं 

राजकारण्यांसारखाच आता 

पावसावरही उरला नाही 

पाहिल्यासारखा भरवसा

त्यानही हिसकावलाय

लेकरांच्या तोंडातला घास 

साऱ्यांनीच सोडली साथ 

साऱ्यांनीच केलेत घात 

म्हणून का आपण मरायचा

हे सारच दु:ख

आपण पचवायचं अन 

पुन्हा नव्याने जगायचं 

हे जीवनगाणे गातच राहायचं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy