STORYMIRROR

Pravin Dongardive

Inspirational

4  

Pravin Dongardive

Inspirational

हे रंग जीवनाचे

हे रंग जीवनाचे

1 min
813


हे रंग जीवनाचे


माणसांच्या अमाप गर्दीत

रोजचं दिसतात इथे

रंग नवे माणसांचे

अन् भकासल्या मनावर

मी कैकदा उधळतो

हे रंग जीवनाचे


पेरल्यात कुणी जाती

जरी एकच आमची माती

आभाळाच्या पदराखाली

मी पेरतो बियाणे माणुसकीचे

जातीच्या तोडून पाती

भरतो हे रंग जीवनाचे


फडकती इथे झेंडे वेगळे

भगवे,निळे, हिरवे,पिवळे

मी मात्र इथे भारतीय

तिरंगा फडकवतो आहे

तेव्हा उफाळून येती मग

नवे हे रंग जीवनाचे


उदासीच्या छायेत इथे

कित्येक अनाथ दिसतात

भाकरीचा रंग इथे

रोजचं शोधत असतात

देवून त्यांना मदतीचा हात

भरु नवे हे रंग जीवनाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational