STORYMIRROR

Pravin Dongardive

Others

3  

Pravin Dongardive

Others

यार तू असा का जुदा झालास?

यार तू असा का जुदा झालास?

1 min
167

 तुझ्या ह्या प्रीतरंगी छायेत जगतांना,

सदैव मग तिचेच प्रितगाणे गात होतो.

आठवणीत तिच्या, पण सावलीत मात्र तुझ्या जगत होतो.

तुझ्या त्या देहाआड मग तिचीच वाट बघत होतो.

 

रविकिरणांच्या त्या पिवळसर रेशमी उन्हात,

तुझे ते मनमोहक रूप सदैव खुलायचे.

लबाड वाऱ्याच्या संगतीत,

पक्षीदेखील तुझ्याच खांदयावर झुलायचे.

 

उन्हात राबणाऱ्या श्रमिक वाटसरूंचा,

तू जन्मोजन्मी सारथी होतास.

मतलबी लोकांच्या या स्वार्थी दुनियेत,

यार तुच एकटा नि:स्वार्थी होतास.

 

दुनियेत नाही तू एकटा,

मीही तुझा जिवाभावाचा साथी आहे.

मरणानंतरही माझ्या देहावर,

तुझ्याच सरणाच्या वाती आहेत.

 

तिच्या आठवणीत त्या जगतांना,

फुलांचा हळुवार सुवास दरवळतांना.

तूच माझ्या आठवणीत सदा आलास,

यार तू असा का जुदा झालास? 


Rate this content
Log in