STORYMIRROR

Pravin Dongardive

Others

5.0  

Pravin Dongardive

Others

नवा चेहरा

नवा चेहरा

1 min
608


------- नवा चेहरा --------


डोक्यावर असून आभाळाचे भार

मी कधिच मानली नाही हार

आभाळालाही डोक्यावर घेऊन

चालत राहिलो या माणसात


मलाही डोक्यावर घेऊन

उभी आहे धरणी माझी माय

मी मलाच म्हटले

उपकार तिचे फेडत जाय

देहातून पिकवून हिरवी साय


धन्य माझी धरणी माय

आभाळही पाहतयं डोळ्यांनी

इथल्या माणसांचे स्वार्थी चेहरे

त्यालाही येतयं रडू

माणसाची अशी वृत्ती पाहून

पण माणूस मात्र


आभाळाच्या आसवांना

पडणारा पाऊस समजतोय

म्हणूनच हा सूर्य जळतोय

रोजचं त्याचे नवे रुप दावतोय

माणसा प्रकाशमान हो रे

चंद्रही रात्रीला सांगतोय

पण माणूस मात्र तसाच जगतोय

रोजचं आपला नवा चेहरा दावतोय


Rate this content
Log in