यारी
यारी
घाव त्यांनीच दिले
डाग त्यांनीच दिले
खेल झाली जखम
मलम त्यांनीच दिले
जिथे वाट संपली
तिथेच भेट झाली
काळजात जागा मोठी
यारी दाट झाली
जाणे येणे तिचे होते
पाहणे माझे रोज होते
बंद झाली खिडकी जेव्हा
मन उदास होते
पाहत होते किती
हाय म्हणत होते किती
घेवून नकार तिचा
परतून आले किती
फुलली कळी
हसली खळी
दिला त्या वेणीला
फुलांचा बळी
