निष्ठुर कली मन अनि कीर्तन मायेचं
निष्ठुर कली मन अनि कीर्तन मायेचं
1 min
179
निष्ठुर कली मन अन् कीर्तन मायेचे
संसार निर्धार आधार बीजाचेII
बीज बोयी मानव, वात्सल्य केवळ त्या चौकटीत
घृणा वाढे ती सदैव, करी मंथन विद्येचेII
कल्लोळ माजे दुःख होता जीवाला
हर्षात जवळी तो मद्याचा प्यालाII
कसा आलो जन्मी, ते अज्ञात सारे
प्रबळ झालो, त्याचे श्रेय लुटे रेII
जननी भासे पापी, जिने जन्म दिधला
तू बीज बोताक्षणी तिला विसरलाII
कुठे फेडीशी हे पांग, सांग तू रे वैष्णवा
अनाथ होशी निर्गमनि नरकातसुद्धाII