घडा
घडा
एका घड्याची ही कहाणी
धर्म त्याचा पाजे पाणी
कोणी दुजा नसे त्याच्या वाणी
एका घड्याची ही कहाणी
अंगावर झेलले त्याने कित्येक वार
घेतलेस समजुनी
असे शाबासकीची थाप
उभा राहिलास सारे अंग
घट्ट बांधुनी
एका घड्याची ही कहाणी
त्याच्या रुबाबाची वाह वाह केली साऱ्यांनी
पण होती त्यास एका तड्याची भीती
जपूनी स्वतःचे तन मन त्याने
शेवटी त्याची कुरुपताच लोकांना दिसली
एका घड्याची ही कहाणी
मातीतला जन्म त्याचा
मातीतच मिटायचे शेवटी आता
सारे सारे काही जाणुनी
कधी कडवे पाणी पाजले नाही कुणा म्हणुनी
एका घड्याची ही कहाणी
