STORYMIRROR

Gauri Athavale

Others

3  

Gauri Athavale

Others

भांड्यांच्या दुनियेत

भांड्यांच्या दुनियेत

1 min
645

उन्हाळ्याची सुट्टी आली

आजोळी मग गर्दी झाली

स्वयंपाक घरातून सुटला खमंग वास

रानफळाचा एकच ध्यास

खेळांची मग झाली चर्चा

हीच मुलांची दिनचर्या

लपाछपी चा डाव रंगला

लपायला होता मजला मोकळा

आदितीने दिली वर्दी

कोठीच्या खोलीत झाली गर्दी

जाते त्यांस पाहुनी हसले किंचित 

सारी मुले झाली अचंबित

पुढे बोलू लागला दगडी पाटा

माहितीचा त्याने लावला सपाटा

नटून थटून आली सुरई

म्हणाली, मीच आहे सगळ्यात सुंदर

मी नाही लावत टिकली पावडर

तरही मी आहे सुंदर

उड्या मारत मारत आला खलबत्ता

म्हणतो कसा, भांड्यांचा तुम्हाला आहे का काही अतापता

काठवटीने केली सुरुवात

मैफिल रंगवली जोमात

लोखंड, तांब, चांदी, शिसं

भांड्यांचे आहेत ना ना प्रकार

एक एक जण देऊ लागले आपापला समाचार

प्रत्येकाचे वैशिष्टय ते अनमोल

मुले म्हणाली, तुमचा सहवास आमच्यासाठी बहुमोल


Rate this content
Log in