झाड
झाड
1 min
295
निःशब्द मी उभा परी ठाम आहे
माझे मन सदा तुझी वाट पाहे
येशील तू जेव्हा असेन मी येथे उभा
तुझी आठवण उराशी धरून आहे
जन्म दिला ज्याने न जाणे कोण तो
पण जीवन दिले ज्याने त्याच्याशी ठाम आहे
पाखरे परतुनी जातील घरट्याशी
तसा तूही येशील का रे मजपाशी?
चातकापरी डोळे लाऊन आहे
येशील तू जेव्हा असेन मी येथे उभा
तुझी आठवण उराशी धरून आहे
