व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व
1 min
1.0K
कुणास नाही चाहूल
नाही कुणास जाणीव
गूढ मनाच्या कोपऱ्यात
हरवले आहे सौजन्य
ही एकच उणीव
सुर परिचित ऐकता
भास होई कुणाचा
न जाणिले कुणी
न जाणता सहारा मिळे कुणाचा
वठवूनी जाती कुणाची व्यक्तिमत्व
कधी ऊन कधी पाऊस
कधी हिवाळ्यातील पहाट
तर कधी उन्हाळ्यातील संध्याकाळ
शोधीत राहे अर्थाचे तत्व
जन्मुनी पुन्हा नव्याने
ओळखूनी स्वतःचे अधिक उणे
वठवती जबाबदाऱ्या
किंचित बहुपणे
ध्यास तोच विचार तेच
तीच शक्ती
ताटव्याप्रमाणे भासती
अशा या बहुरंगी व्यक्ती
