या वाटेवरती
या वाटेवरती
1 min
380
वाटेवरती मी एकटी
रस्ता चढता झाडे रानटी
कर्णबधीर शांतता
तळपता सूर्य आणि अंगात कणकण
वर पहावे तर डोळे मिटतात
वारा वाहतो आहे आणि
पानांची सळसळ
पाने गळून पडतात
दृश्य अधिकच भयाण
रस्त्यावर काट्यांचे सडे
अचानक थरकाप
मनात अनेक आकांक्षा घेऊन मी चालत आहे
कसाही करुन हा रस्ता पार करायचा आहे
या वाटेवरती ना कुणी परिचित
कुणीतरी भेटाव ज्याला पत्ता विचारावा
अजुन किती दूर जायचे आहे?
समोर पहावं तर रस्ता संपत नाही
अजुन किती वेळ लागणार आहे?
नुसती तगमग
भेटली काही माणसे
विचारून पाहते यांना
निरखून पाहिलं
ही तर केवळ पोकळ मनुष्याकृती
लांबून सुंदर भासणारी
नवरासाचा अभाव असणारी
आतून निर्मनुष्य
पुढे शोधत राहते
कुणी भेटेल या वाटेवरती
पूर्ण करेल अपेक्षा
परंतु येथे दिसताहेत केवळ द्वेष आणि इर्षा
