STORYMIRROR

Sanjana Kamat

Children

3  

Sanjana Kamat

Children

बालगीत

बालगीत

1 min
255

बघ माझा बाळा तुला पाहून,

चांदोबा खुदकन हसतो कसा.

तुझ्याशी लपंडाव खेळायला,

आकाशातून लपून पाहतो जसा.


चांदोबा रे चांदोबा सांगना जरा,

कसा तू गोल गोल वाढतोस भराभरा.

कोणते टाॅनिक घेतोस, बाळाला सांग जरा.

न दमता साऱ्या जगाला, प्रकाश देतोस खरा.


बाळाला जेवण जेवण्याचा असे कंटाळा,

टीव्ही, मोबाईल अन् खेळ पसारा. 

जेवणाच्या व अभ्यासाचा दमछाक तोरा.

गोड गोड खाण्याचा छंद तो न्यारा


चांदोबामामा माझा बाळाला खांद्यावरून,

मिरवून दाखव तुझी चंदेरी दुनिया.

साऱ्या जगाची संस्काराची माया.

शिकव अंधारात चमकण्याची किमया.


दाखव सुंदर ती परीची दुनिया,

गुणी बाळालाच देतोस नारे तूच खावू.

टीव्ही मोबाईल खेळ नको तू सारखा पाहू.

उगाच हट्टाने नको रडत राहू.


कोजागिरी पोर्णिमेचे रूप तूझे मोहविते.

बाळाला माझ्या अभ्यासाची महती पटू दे.

जीवनात त्याच्या कस्तुरीचा सुगंध दरवळू दे.

माय बाबाच्या प्रेमात संस्कार जपू दे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children