STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

कोरोना -कविता

कोरोना -कविता

1 min
221

कोरोना मानवाला खूप काही शिकवूण गेला 

जीवाभावाची कोण गंभीर प्रश्न उभा केला 

उपासमारीत जगताना काळीज देऊन गेला 

थोड्या दिवस का होईना गरीबाने गरीब जिवंत ठेवला 


मदतीची याचना पोटासाठी हलवून गेला 

आश्वासना शिवाय तो उपासी जगत राहिला 

ज्याच्याकडे खूप काही होते तो घरात दडुन बसला 

गरीब उपाशी जगताना त्यांना दु:खाचा वारा नाही लागला 


आपली रक्ताची काही माणसे हाडतूड करू लागली 

आपल्याकडे येऊ नका असी वारंवार सांगू लागली 

जवळ असलेली माणूसकी दाराबाहेरच ठेवली 

चहा,पाणी सुद्धा कोणी कुणालाही विचारी ना झाली 


यात जे दुर्दैवाने सापडले त्यांचा भयान अंत झाला 

अश्रू भरलेल्या काळजाच्या माणसाना दूरूनच सोडून गेला 

बाहेरूनच हे जग प्रवाशासारखा कायम जगला 

धन, ऐश्वर्य इथेच तसेच पृथ्वीवर सोडून गेला 


नियम, शिस्त शाळेसारखी प्रत्येकाने जपली 

त्यामुळेच तर त्यातून बरेचजण वाचली 

कोरोनाने जीवनात संघर्ष आणि लढा शिकविला 

काटकसरीचा मोलाचा सल्ला प्रत्येकाला दिला 


नेहमीची वर्दळ असलेले जग एकदाचे शांत झाले 

दोन हाताचे काम सुटले हे भयंकर दु:ख वाट्याला आले 

बेरोजगारीने पुन्हा भयानक जगाला विळखा घातला

दोन वेळच्या भाकरीचा नव्याने प्रश्न उभा केला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract