STORYMIRROR

Sanjana Kamat

Children

3  

Sanjana Kamat

Children

मी कोण?

मी कोण?

1 min
193

मीच आई, मीच ताई,

मीच सुगरण अन् घरंदाज बाई.

साऱ्या नात्यांची माझात सरबराई.

आदर्श शिक्षिका होत पाहते, विद्यार्थिंची नवलाई.

मी कोण? म्हणून काय पुसता....


मी माय-बापांची लाडकी सोनपरी,

सासर-माहेर जोडत नाती जपणारी.

अन्याय पाहता मीच होत चंडीका,

अबला नारीचे सबला रूपधारीका

मी कोण? म्हणून काय पुसता....


मीच कलाकार, मीच चित्रकार,

माझ्यातील कलागुणांचा करत अविष्कार.

भेटता मराठी शिलेदार समूह अन्

प्राप्त झाला मज कवियत्रीचा ही मान.

मी कोण? म्हणून काय पुसता....


मी मराठी भाषेचा सक्षमीकरण्यास ध्यास.

मराठीच्या प्रगतीची मी जीवन ज्योत.

काव्य स्पर्धाची खुलते गोडी गुलाबी रंगत.

साऱ्या राष्ट्रातील कवी-कवियत्रीची इथे पंगत.

मी कोण? म्हणून काय पुसता....


मी दिवास्वप्न घेत भरारी, मी एक प्रगतशील नारी.

माणुसकीची तिजोरी जपते मी भारी.

अभिमान मज मी भारत मातेच्या कुशीत जन्मले.

देशाची, भाषेची शान जपणाऱ्याना सलामी माझी ही न्यारी.

मी कोण? म्हणून काय पुसता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children