कला
कला
कलवले हे मन माझे, या नटलेल्या नानाविध कलांनी.
पुन्हा रुजते आहे बीज तेच, वसुंधरा बहरेल याच फुलांनी.
झाडांना पर्वा उद्याची, काळजी आवडीची घ्यावी.
बुडालेले जे आहे सर्व काही, काढून बुचकी समजून घ्यावी.
आधीचे थांबले होते, तेथूनच नवी सुरवात होईल.
नव्या युगाचा प्रारंभ, एक एक धागा जोडला जाईल.
पुन्हा एकदा गायल्या जातील, लोककलेच्या लोकगाथा.
लोकांनीच पुसून टाकला, मलीन झालेला लोकांचाच माथा.
