STORYMIRROR

Aaliya Shaikh

Inspirational

4  

Aaliya Shaikh

Inspirational

किरण बेदी

किरण बेदी

1 min
541

शक्य आहे  सगळे असंभव नाही काही

प्रयत्नांती मिळते यश किरण बेदींची ग्वाही

श्रेष्ठ असे हे विचार त्यांचे आणि निर्भीड स्वभाव

पहिली महिला आयपीएस अभिमानाने उंचावले नाव

बदलली कैद्यांची दशा नि महिला सशक्तीकरण

उत्तम समाज कार्यकर्त्या केले सशक्त राजकारण

बाबांच्या पावलावर पाऊल टेनिस खेळामध्ये निपुण

करून घेतली विजय प्राप्ती पदरी घेतले यश मिळवून

ट्राफिक डीसीपीचे पद सांभाळले दिल्ली शहरात

'क्रेनबेदी' हे पडले नाव करता क्रेनची सुरुवात

अनेक पदांवर कार्यरत राहिल्या त्या लागोपाठ

सामना करुन विवादांचा पोलीस सेवेची सोडली गाठ

कित्येक झेलली आव्हाने येता बिकट परिस्थिती

संकटात अडकूनही तिने टिकून ठेवली मन:स्थिती

सन्मान केला समाजाने केले अनंत पुरस्कार प्रदान

शूर ,धाडसी किरण बेदीने नारी जातीची उंचावली मान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational