STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Drama Tragedy Thriller

3  

manisha sunilrao deshmukh

Drama Tragedy Thriller

किंमत कळली

किंमत कळली

1 min
202

किंमत त्यालाच कळले

जे जीवनाशी लळले

दिव्याला पण तेव्हाच कळते

जेव्हा तो अंधारात दुसऱ्या साठी जळते

पक्ष्याला पण त्याची शक्ती तेव्हाच कळते

जेव्हा तो आभाळात उंच झेप घेवून उडतो

कोणाची किंमत त्याच रूप बघून करून नका..||ध्रु||

  

      अन्नाची किंमत पण त्याच व्यक्तीला कळली

         ज्याच्या नशिबी भिक मांगाची वेळ आली

          आई या शब्दाची किंमत तेव्हाच कळली

        जेव्हा स्वतःच आई होण्याची वेळ आली

        कोणत्याही गोष्टीची किंमत तेव्हाच कळते

          जेव्हा ती वेळ निघून गेलेली राहते

          म्हणून वेळेची किंमत वेळेतच ठरते..||१


लांभ जाण्याची किंमत पण झाडालाच कळते 

जेव्हा त्याच्या फांदीचे सर्व पाने खाली गळते

पैश्याची किंमत पण त्यालाच कळते

ज्याच्या मेहनती मधून घामाचे मोती गळते

शिक्षणाची किंमत त्यालाच कळते

ज्याच्या नशिबी बुद्धी तर वळते

पण पैसा त्याच्या पासून दूर पळते..||२||


        दुःखाची किंमत पण त्यालाच कळली

          ज्याच्या सुखात सर्वांनी मिठाई गिळली

          दुःख येताच त्याच्या पासून पळ काढली

        जिंकण्याची किंमत पण त्यालाच कळली 

          जे शंभर वेळा अपयशा सोबत भिळली

          या किंमत ठरवेच्या दुनियेपासून जरा

          लांबच ठेवरे बाप्पा मला..||३||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama