किनारा
किनारा
आज किनारा असा भेटला, दाऊन एक सिमा.
अथांग सागर असा संपला, अहंकार झाला धिमा.
एवढं सामर्थ्य घेऊन सोबत, मोठेपणा मिरवत होता.
सुरवात आणी शेवट माझ्यापसूणच, किनारा फक्त सांगत होता.
प्रत्येक लाटा गनीस, स्पर्धा तुझीच सुरू होती.
नातं होतं आपलं प्रेमाचं, पण वर्चस्व दाखवत होती.
काहीही असलं तरी, तुझ्यासाठी मी अन माझ्यासाठी तू खास आहे.
सगळे पाहून गेले तरी, आपन आपल्या जागी उभा आहे.
भव्य तुझ रूप, त्यावर सोनेरी झालर माझी.
सोबत कायमची आपली, नित्य सागर किनारी.
