Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

सुमनांजली बनसोडे

Abstract Others

3  

सुमनांजली बनसोडे

Abstract Others

खरंच का रे

खरंच का रे

1 min
232


खरंच का रे एकदाही नाही वाटले...

प्रेम माझ्या बद्दल...

घराजवळुन सोबत शाळेत जाताना नाही...

पण शाळेत एका बेंचवर बसल्यावर तरी...

हसताना आणि बोलताना नाही....

पण अबोल असताना तरी...

नजरेला नजर मिळताना नाही...

पण शाळेतून घरी येताना तरी...

खरंच का रे एकदाही नाही वाटले....


दिवसाच्या घाई गर्दीत नाही...

पण रात्री स्वप्न रंगवताना तरी...

काॅलेजला जाताना नाही...

पण गच्चीवर असताना तरी...

माझे लग्न ठरवल्यावर नाही...

पण तुझे लग्न असताना तरी...


मला पाहिली पाहिल्यावर नाही...

पण बायको माहेरी गेल्यावर तरी...

तुझ्या मुलांसोबत असताना नाही...

पण माझे मुले पाहील्यावर तरी...

वयाच्या 40 नंतर नाही...

पण BP, शुगर ची गोळी घेताना तरी...


तुझ्या मुलांच्या लग्नात नाही...

पण माझ्या मुलांच्या लग्नात आल्यावर तरी.

नातवंडाच्या बारशाला नाही...

पण 75 वा वाढदिवस साजरा करताना तरी...

माझ्या पतीच्या अंतविधी ला आल्यावर नाही...

पण तुझी बायको गेल्यावर तरी...

खरंच का रे एकदाही नाही वाटले.. 

प्रेम माझ्याबद्दल....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract