Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar

Abstract Inspirational

खरं प्रेम

खरं प्रेम

1 min
783


वेलीवरचं फूलतोडण्या इतकच 

सोपं असतं ह्यांना दिल तोडणं |

फुलांचा त्याच वापर करून 

जमवू पाहतात हे दिल जोडणं | |१| |


दिल ह्यांचं दिल नसतं तर 

हॉटेलिंगच गलेलठ्ठ बिल असतं |

वापरुन पाहिजे तेव्हा असं तिला

चुरगाळून फेकून दिलं नसतं | |२| |


पाडगावकरांच्या भाषेत प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे प्रेमच असतं |

एकमेकांच्या सुखासाठीच 

एकमेकांनी नकळत झुरायच असतं | | ३| |


एकमेकांसाठी झुरतांना 

स्वत:च्या संसारासाठी उरायचं असतं |

दोघांनीही शेवटी आपलं घर 

आपणच सावरायचं असतं | |४| |


क्षणभर स्वत:ला सावरुन 

क्षणिक वासनांना आवरायचं असतं |

निकोप नितीमान समाजासाठी 

हे बलिदान करायचं असतं | |५| |


राजरोस असं प्रेमाचं प्रदर्शन

गावभर मांडायचं नसतं |

जमलंच तर एकमेकांसाठी 

गावाशीही भांडायचं असतं | |६ | |


स्वत:साठी जगतांना 

समाजहिताचंही रक्षण करायचं असतं |

आपणच आपलं चांदणं होऊन 

आकाशभर पसरायचं असतं | |७| |


भावनांशी एखादीच्या खेळून 

असं नसतो करायचा टाईमपास |

नाहीतर एखाद्या बिचारीच्या गळ्याला 

समाज लावतो फास | |८| |


ह्यांचा म्हणे खूप खेळ छान होतो 

त्या बिचारीचा मात्र जीव जातो |

Valentine Day चा सा-यांना 

अखेर संदेश चुकीचा जातो | |९ | |


प्रेम हे स्वप्नील असत्य मानून 

जीवनात निराश व्हायचं नसतं |

आपल्यानं हे नसेल होणार 

तर विनाकारण प्रेम करायचं नसतं | |१० | |


आज व्हेलेंंटाईनडे च्या नावाखाली वासनेचा मांडलेला बाजार बघून खरे प्रेम नक्की काय हे सांगण्याचा कवितेतून प्रयत्न केला आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract