STORYMIRROR

Chaitali Warghat

Inspirational

3  

Chaitali Warghat

Inspirational

खराब हाय गोट (वऱ्हाडी कविता)

खराब हाय गोट (वऱ्हाडी कविता)

1 min
293

डोयात सुकलेल पाणी,खोल जायल हाय माय पोट

खराब हाय गोट,म्हातार पणाची खराब हाय गोट


लेकराले लहानाचं मोठं करत,साऱ्या गरजा पूर्ण करावं

आपल्या इच्छा मारावं,तयच्यासाठी पै पैसा जमवावं


वाटलं होत म्हातारपणात देणार,बुडीले अन मले साथ

पोटच्या माया लेकानचं मारली,माया इच्छेवर लाथ


रात सारी विचारात,डोयाले डोया लागत नाही जाय

बुडी मयी म्हणे,तुमचं डोकस कोणत्या विचारात हाय


काय सांगावं तिले जीव अटकला होता पोटच्या पोरात

पोरग साहेब झाल्यावर मी पण चालीनं म्हटलं तोऱ्यात


सार झालं मनासारखं,लग्न करून दिल पोराचं थाटात

हळूच दुःखाच डोंगर मग,येऊन ठेपल माया वाट्यात


रोकटोक सुरु झाली अन,पोयी कमी पडत होती ताटात

काही म्हणता सुनबाई म्हणे,तुम्हा नाही टाकत काट्यात


पोरगं हर एक गोटीवर,बायकोची हाजी हाजी सतत करे

बायकोले सोडे अन,आम्हाले जाणूनचं भलकाई बोलें


थकून गेलो होतो राजे हो! रोज रोजच्या किटकिटिले

घर सोडून म्हातारपणात जावं कोठ,म्हटलं माया बुडीले


जेवढं झालं तेवढं सर्व काही म्या,तर केल पोरासाठी

चालवाले देली गाडी अन,मायी हक्काची शेतीवाडी


बुडी म्हणे शेवटी मुकाट्यानं सहन करत,थोडा धीर धारा

लेकाचा संसार सुखाने टीकावं,ईश्वर चरणी प्रार्थना करा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational