खरा सूर्य...
खरा सूर्य...
. खरा सूर्य " पुष्पाग्रज " अज्ञानाचा अंधार नाही सूर्याने दूर झाला म्हणूनच माझा हा भीम जन्मा आला . त्याच्याच ज्ञान प्रकाशाने उजळल्या दाहीदिशा केले स्वयंप्रकाशीत आम्हा,दूर झाली दशा. वाघिणीचे दूध आम्हा भीमाने च पाजले गुरंगुरंणारे वाघ इथे हे आज निपजले . अस्पृश्यता केली दूर ,माणूस झालो आम्ही नव्हता वाली कोणी सारी भीमाची च करणी. दिला धम्म,न्याय,हक्क सारंच भिमाने उध्दारले आम्हा झाले या जीवनाचे सोने. जगात मोठी क्रांती केली भिमानेच खरी अरे खरा सूर्य अवतरला हा या भूवरी . त्या भीमसूर्याने साराच अंधार हा गिळला अंधार झाला दूर आम्हा प्रकाश मिळला या खऱ्या सूर्याने च सारे हे जग उजळले अन् आम्हासाठी झाले खुले आभाळ हे निळे. नाही जगी तोड त्यांच्या या महान कार्याला अन् कोटी कोटी प्रणाम त्या खऱ्या सूर्याला. गायकवाड रवींद्र गोविंदराव दापकेकर जि.नांदेड ९८३४२९८३१५
