खोकला
खोकला
कुणाकडे पाहुण
मनी साठवून
ठेवला जरी दाबून
येतो तरी खोकला.......
दवाखान्यात जा
गोळ्या सीरप घ्या
झोप लागताच थोडी
येतो तरी खोकला.....
धुळ, वारा अन् धुर
अॅलर्जी सारे म्हणतील
गुंडाळल रुमालानं सारं
येतो तरी खोकला........
घरातील त्रस्त सारे
राहती गप्प - गप्प
काही बोलायच्या आत
येतो तरी खोकला....
औषधा नाही गुण
का बॅक्टैरियाच व्दाड
उचंबळून किती उत्कट
येतो तरी खोकला.......
ख्वाक, ख्वाक करून
कापते अंग कण कण
मोहल्ला होते जागरन
येतो तरी खोकला....
वातावरणाचा बदल
पाण्यात जीवन ड्रॉप
घेतो दुधात ओवा हळद
येतो तरी खोकला........
नेहमीच येतो मग पावसाळा
दूर करावे का या म्हणीला?
वर्षातून एकदा सगळयांनाच
येतो तरी खोकला.......
