खंत शिकलेल्या तिची
खंत शिकलेल्या तिची
चार शब्द शहाणपणाचे सांगते मुली
पुस्तकातले शब्द आज माझ्याशी बोलती
शिक तू बाराखडी या अयुष्यात जीवनाची
शिक्षण ते हव जे नाही पानात लिहिलेलं..
शिकली तू सगळ तरी आडाणी च राहिली
भांडी कुंडीच्या खेळण्यात ओळख विसरली
शब्द शब्द तूझे साथी होतात हर एक भावही
तरी अबोल तुझा आवज आक्रोश करु पाही
कालची चिमणी तू आज मुक बाहुली व्हावी
कल्पनेत न हरवता स्वप्न कोणी हिरवाली तुझी
लाख मोलाची मन जपली तू या नात्यातली
पुस्तकशी तुझ हर एक नात का ती तोडू पाही
शब्द असे बोलू लागले पान न पान हिरव होत...
मागण तस काही नव्हत ,अस्तित्वते हरल होत..
शिकली तरी आडाणी सांगती ओळख खरी
ओठावरचे भाव मनीचे असे तिने कोण्दले होते
शिकलीच नसती तर हक्काची जाणिव नसती
व्यक्त व्हायला शब्द आज अनुमती मागत आहेत
असा कैदेत आज बोलका विश्वास झुरतो आहे..
तिचा आवज नात्या साठी दाबला जात आहे
शिकलेली ती आता हाउस वाइफ झाली..
या उपर तिच जगणं कुणी नाही जाणल..
शिक तू मुली तुझ्या स्वप्नात माझी भरारी
आईची शब्द परतुनी ती तिच्या मुलास सांगी
अशी का वागतात ही जगवेगळी माणसं
बोलक्या मुलीला मुकी असावी ती...
मुक्या जीवावर भरपूर प्रेम करा अस का सांगतत
ते आता कळल मला..
