खंत कशाला
खंत कशाला
आज पालवी उद्या पानगळ
का यावी हि उगाच मरगळ
जीवन चक्राचे मेरू आपण
का वाटावी जन्माची अडगळ
इथेच जगणे इथेच मरण
का ठेवावे स्वतःस तारण
नियतीची जखम सावरून
परमात्म्यास जावे का शरण
खंत कशाला जगा निर्मळ
का दुसर्या द्यावे सढळ
मरणाच्या उंबर्यावर एकटा
आयुष्याचे चिंतन करा सरळ
