खंबीर मनाची स्त्री
खंबीर मनाची स्त्री
कशाला हवं अस जिणं
किड्या-मुंग्यांचं, लाचारीचं अन् अपमानाचं
तोंड खुपसून तळहातांत सतत रडत बसण्याच??
डोळ्यांत सजवताना स्वप्ने नवी
का नेहमी फुलपाखरू बनून उडावं
या बुरसटलेल्या समाजाच्या
सतत पायाखाली चिरडलं जावं??
उंचच उडायचं आहे...
तर मग पसरव तुझे पंख,
आणि आकाशातील घार बन
फणा काढून फुत्कारणाऱ्या
त्या भुजंगांना गतप्राण कर..
मान्य आहे.....,
ठेच लागेल, जखमा ही होतील
त्यांना कुरवाळत बसू नको
खंबीर करून स्वतःला
तूच लक्ष्मी, अन्नपूर्णा
आणि चंडिका सिद्ध कर..!
