खेळणी
खेळणी


सान मुलांचे असे खेळणे
वरची वाळू पडते खाली
जुने वाळूचे घड्याळ होते
आज खेळणी त्याची झाली (1)
लग्न मंडपी गं घालातूनी
घटिका पात्र त्यात ठेविती
भरता घटिका पात्र बुडे ते
मंगलाष्टके नाती जुळविती (2)
लाल रंग रक्ताचा असतो
सजीव जगतो त्याने जीवन
गटारगंगा प्रदूषणाची
जगणे झाले आहे कठीण (3)
दान दिल्याने धनही वाढते
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
भुकेल्यास द्या अन्न पाणी हो
रक्तदान तर महा पुण्य ते (4)
प्रदूषणाने खचली शक्ती
कसा करू रोग प्रतिकार
गरज असे रुग्णा रक्ताची
रक्तदान द्या हा उपकार (5)
लाल रंग त्या खेळण्यातला
सूचित करतो असेची काही
देत राहावे आनंदाने
भारतीयांची रितची ही (6)