STORYMIRROR

Sarika Jinturkar

Children

3  

Sarika Jinturkar

Children

खारूताई

खारूताई

1 min
204

करडा तपकिरी रंग  

मऊ मऊ केस भरलेले अंग


 दात तुझे अणकूचीदार

कठीण कवचाची फळे सहज खातांना दिसते तू गोंडस फार 


जवळ जाताच पळते लांब

 खारुताई भित्री जाम  


बसते डौलदार, उभी रहाते ऐटदार  

भर भर पळते रस्त्यावर

 झरझर चढते झाडावर  

पळापळीची किती ही घाई

 झुबकेदार शेपटीची ऐट 

तुझी ही भारी  


जमीन उकरून साठवून ठेवते अन्नास 

न खाल्लेल्या काही बिया दाणे जमिनीत तशाच राहतात तुझ्या या सवयीमुळे मदत होते वनसंवर्धनास  


 सेतू मधले काम जाणुन श्रीरामाने हात फिरवून आशीर्वाद दिला तुला भरभरून मिरवते अजून पाठीवरून

  

राम सेतू बांधण्यात म्हणे तुझा होता वाटा रामायणात गौरवलेला तूच ग तो जीव छोटा  


लुकलुकते तुझे डोळे 

जणू काळे मणी

 प्रिय असे सर्वांना किती तु गोजिरवाणी  

 

 खाली वर करता करता 

कसा तुला ग थकवा येत नाही...? 

खाते कुरूम कुरूम 

बघताच जाते पळून

 किती चपळ, कार्यक्षम 

आनंदी, स्वच्छंदी जगण्याचा संदेश तू आम्हास देते जणू ....🙏😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children