STORYMIRROR

Shamal Kamat

Others Children

3  

Shamal Kamat

Others Children

शाळेतल्या गमती जमती

शाळेतल्या गमती जमती

1 min
539


आजही आठवते मला

माझी प्रिय शाळा

शिक्षकांनी लावला होता

मुलांना मनापासून लळा


अभ्यास केला नाही म्हणून

शिक्षक द्यायचे आम्हाला शिक्षा

त्यातूनच आमच्या जीवनाच्या

 रुंदावल्या होत्या कक्षा


शाळेतल्या आठवणी म्हणजे

होत्या मजेशीर गमती जमती

एकदा तर झाली होती

माझी खूपच फजिती 


स्टेजवर नाटक करतांना

संवाद मला नाही आठवले 

भलतेच काहीतरी बोलून

कसेबसे होते निभावले


रोजच्या थापा खोटेपणा

पकडला गेला होता

आठवण त्याची येते

शाळेची गोष्ट सांगता


Rate this content
Log in