काल बाप्पा जाता जाता
काल बाप्पा जाता जाता


काल बाप्पा जाता जाता
माझ्याशी बोलला खूप
कोरोनाचे सावट पाहून
होतेय म्हणे खूप दुःख
तुमच्या पाठीशी आता
मलाच उभे राहावे लागणार
पण काय करणार सध्या मला
माझ्या घरी जावे लागणार
घरी गेलो की बाबांकडे
करतो त्याची तक्रार
तेच पाहून घेतील मग
काय आहे हा प्रकार
जिथं तिथं माझे भक्त
आजारी पडले आहेत
याआधी कधीच नाही
असे काही घडले आहे
तुम्ही तुमची काळजी घ्या
मी आहे सोबत तुमच्या
खबर घेतोच मी जाऊन
या परिस्थितीची सध्याच्या