Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RAJESH INGLE

Children

3  

RAJESH INGLE

Children

कोरोना

कोरोना

1 min
64

आला आला कसा हा कोरोना

घरा बाहेरही पडता येईना

खेळायला पण कोणीही जाईना

काय चाललंय तेच कळेना ll 1 ll

टीव्ही, मोबाईलचाच सारा वेळ

गंमत-जंमत चा भलताच मेळ

हा कसला आहे जीवघेणा खेळ

जीवनाची झालीय नुसतीच भेळ ll 2 ll

सर्वजण आता घरीच राहतात

एकमेकांशी भरपूर काही बोलतात

सर्व मिळून खूप काम करतात

सतत नुसते हात धुवा म्हणतात ll 3 ll

मोकळ्या हवेत घेऊ दे श्वास

मौज-मजा करावी हाच एक ध्यास

आत्ता कुठे करावा वाटतो अभ्यास

घरही म्हणतंय अरे व्वा शाब्बास ll 4 ll

आलाय घरी आता कंटाळा

सांगा कधी सुरू होणार शाळा

औषधाने बसू दे आता आळा

जा घरी तुझ्या कोरोना बाळा ll 5 ll

कोरोना किती होता छान 

मोठे पण झाले पहा लहान

शिकवून गेला जगण्याचं गाणं

चला ठेवा सर्वांनी स्वतःचे भान ll 6 ll

Rate this content
Log in