Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RAJESH INGLE

Others

3  

RAJESH INGLE

Others

शिक्षक

शिक्षक

1 min
212

शिक्षणाचा मनी भाव 

ना कधी करतो दुजाभाव 

ध्यासात हिताचा ठाव 

गुरु वंदितो सारा गाव ll १ ll 

विद्या मंदिरातला मी देव

ज्ञानवसा हीच माझी ठेव

ज्ञानाची सदा करतो देवघेव

ऑनलाईनचं आलं जरी पेवं ll २ ll

दगडांना पण मी घडवतो

सुजाण नागरिक बनवतो

आयुष्याचं सार सांगतो 

ज्ञान देऊन कृतार्थ होतो ll ३ ll

 मी कायम आहे ज्ञानार्थी

शिक्षणाचं दान हे निःस्वार्थी 

घडवतो मी सदा विद्यार्थी 

आयुष्य हे असेच परमार्थी ll ४ ll

ज्ञानाचा मी सदा भुकेला

पुस्तके हेच माझ्या साथीला

ज्ञानज्योत जीवनाच्या वातीला

मरूनी परी उरतो कीर्तीला ll ५ ll 

बदलली शिक्षणाची गती

माझी मात्र एकच निती

शिक्षणाची सांगू महती

घडवू सर्वांची प्रगती ll ६ ll

Rate this content
Log in