Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

RAJESH INGLE

Inspirational


4.0  

RAJESH INGLE

Inspirational


ज्ञानज्योती

ज्ञानज्योती

1 min 26 1 min 26

सावित्रीबाईंना देऊनी साथ 

पेटवली अखंड ज्ञानाची वात

स्त्री जात आली माणसात

टाकुनी अंधश्रध्देची कात ll १ ll


मनी स्त्री उध्दाराची आस

शिक्षणाचा मनी ध्यास

केला निरंतर अभ्यास

घेण्या स्त्रियांनी मोकळा श्वास ll २ ll


त्यागाला तुमच्या वंदन

धर्मांधानीही घेतले लोटांगण

फुलविले स्त्री जातीचे अंगण

रोमहर्षित होते साऱ्यांचे स्पंदन ll ३ ll 


शिकवण्या तुम्ही बनलात बाई 

वात्सल्यमय सर्वांच्या आई 

सोबतीला फुले अन् उस्मान भाई

जन्माचे सार्थक तुमच्याच पाई ll ४ ll


होत्या स्त्रिया निरक्षर

माई व साऊने केले साक्षर

गिरवू लागल्या आत्ता अक्षर

उभारला त्यांनी ज्ञानाचा संगर ll ५ ll


स्त्रीचं अस्तित्व तुमच्यामुळेच आहे

आरक्षणाची खरी मानकरी आहे 

स्त्री ही देशाची जननी आहे

माई तू कायम पूजनीय आहे ll ६ ll


Rate this content
Log in

More marathi poem from RAJESH INGLE

Similar marathi poem from Inspirational