सर्वस्व तू
सर्वस्व तू


लेक माझी
लाडकी तू
प्रिया माझी
सर्वस्व तू........१
जगण्याचा
आधार तू
श्र्वास माझा
मुलगी तू.......२
कर्तव्याची
खाण तू
स्वभिमानी
छोकरी तू........३
संस्कारांनी
घडली तू
शिक्षणाची
प्रेरणा तू......४
एकमेव
विश्वास तू
नाही कोणी
शिवाय तू.......५
शिस्त प्रिय
कन्यका तू
आज्ञाधारी
मुलगी तू........६
ममतेचे
भांडार तू
कैवल्याचे
प्रतिक तू.........७
मदतीचा
सागर तू
गरीबांची
देवता तू......८
पिडीतांची
तारक तू
अडल्यांची
मदत तू.......९
अभिमान
आईची तू
लेक तिची
सर्वस्व तू.......१०