पाटी
पाटी
1 min
353
प प पाटी
दे न मला आई
गिरवीन त्यावर
त त ताई...
पाटी आहे काळी
छोटी छोटी सान
आयत आहे ती
खूप खूप छान....
शाळेला जाईन
मजेत पाटी मिरवीन
अ,आ इ,ई त्यावर
छान छान गिरवीन
शाळा सुटेल जेव्हा
घरी आईबरोबर येईन
बाईंनी म्हटलेली गाणी
आजी,आजोबांना म्हणून दाखवीन....