आलाय कंटाळा
आलाय कंटाळा


खेळण्या-बागडण्याच्या वयात
आम्ही जबरदस्ती घरात
नको जाऊ बाहेर म्हणतात
कोरोना नावाचा राक्षस
उभा आहे दारात
राक्षस म्हटले की त्याला
असतात दोन शिंगे
कधी-कधी तीन-चार डोळे
नाही तर कधी नुसतीच भिंगे
हा हा करून मोठ्यांदा हसतो
बघितला आम्ही त्याला टीव्हीवर
इथे मात्र असा कोणी
दिसत नाही रस्त्यावर
किती दिवस आम्ही आता
घरात लपून-छपून बसायचं
मित्रांना नाही भेटायचं
मैदानावर नाही जायचं
एकटाच घरात स्वतःशीच
किती दिवस खेळायचं ?
इतके दिवस आवडत
नव्हती शाळा
पण आता मात्र घरात
बसून आलाय कंटाळा