माझी छकुली
माझी छकुली


रुसली गं माझी छकुली रुसली
गाल फुगवून बसली गं बसली
रागोबा आला कोठून कळेना
पण गालाची पुरी मात्र फुगली.
दादाने खास केली चुगली वाटते
मग आईने दिला का धम्मक लाडू?
पण आईची तर लाडली ती छकुली!
दादालाच मिळेल तो आईचा झाडू.
डोळे केले मोठाले अश्रूने ते भरले
आळी मिळी करुन बसली कोपऱ्यात
चैन मला पडेना छकुली ती बोलेना
बसली ती शांत डोके घालून गुडघ्यात.
चोकॅलेटचा डबा देते तिला सारा
दादाला देऊ फक्त एवढासा तुकडा
चॉकलेट खाऊन सगळ्या संपल्यावर
गाली बकाणा भरून दावील हसरा मुखडा.