STORYMIRROR

Yadira Mendhe

Children

3  

Yadira Mendhe

Children

तू

तू

1 min
294

असंख्य येतील संकटे ..तू नीड़रपणाचा घे बोध ..

स्वयं- प्रेरीत होण्यास तुझ्यातील सावित्री शोध..

खडतर मार्ग ,अंधारी वाट ..पण तू थांबु नकोस 

या अंधारातुनही मार्ग दिसेल

शिवबा घडविण्यासाठी तुझ्यातील जिजावु शोध..


क्रोध, द्वेष जागोजागी सापडेल..दुर्लक्ष कर

मनात करूणा जपण्यासाठी तुझ्यातील सिंधुमाई शोध..


आकाशाला गवसणी घालतांना पाय तुझे जमिनीवर ठेव..

ध्येय-प्राप्तीपासुन भरकटतांना वाटलं तेव्हा तुझ्यातील कल्पना शोध..


अन्याय होतांना कधीच शांत बसु नकोस..विरोध कर

त्याविरूद्ध लढतांना शक्तीहीन वाटले तर तुझ्यातील लक्ष्मीबाईशोध..


जीवनसमरात लढतांना असंख्य विरोधक उभे होतील..लढत रहा

लढतांना एकटेपणा वाटला तेव्हा तुझ्यातील इंदिरा शोध..


समस्या येतच राहतील ..त्यांना पूर्णविराम नसेल..झुंजत रहा..


त्यांच्या मुस्कटात मारण्यासाठी तुझ्यातील मेरी कोम शोध..                


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Yadira Mendhe

तू

तू

1 min वाचा

Similar marathi poem from Children