आणि हे सर्व मी माझ्या खिडकीतून पाहतो.
आणि हे सर्व मी माझ्या खिडकीतून पाहतो.


ॲमेझाॅन स्वःताची हिरवळ हरवतो,
सहारा महाक्रोधामध्ये खुप तापतो,
त्याच वेळी आभाळ एकटेच रडतो,
आणि हे सर्व मी माझ्या खिडकीतून पाहतो.
दिवसामागे दिवस उदासपणे जातो,
मानव अविरत समस्या निर्माण करतो,
त्यामध्ये स्वःताच मृत्यू तो लिहीतो,
आणि हे सर्व मी माझ्या खिडकीतून पाहतो.
एकाक्ष निमुटपणे एकटाच जगतो,
कर्तबगार मस्तक अन्यायापायी झुकतो,
महाभयंकर विनाशाने त्याचा अहंकार ठंडावतो,
आणि हे सर्व मी माझ्या खिडकीतून पाहतो.
p>चाली-रितींचा विनाश तोच करतो,
त्याची अनमोल संस्कृती तोच मिटवतो,
कौशल्याचा कलंक स्पष्टपणे खोडतो,
आणि हे सर्व मी माझ्या खिडकीतून पाहतो.
मानव त्याची मर्यादाच विसरतो,
प्रत्येक वस्तूला स्वःताची मालकी दाखवतो,
आपत्तीला तोच क्रुरतेने आव्हाहन देतो,
आणि हे सर्व मी माझ्या खिडकीतून पाहतो.
ज्वालामुखींचा पृथ्वीतलावर विद्रोह होतो,
निर्सग मस्तकी क्रोध धारण करतो,
मानव जातीचा विनाश तेव्हा होतो,
आणि हे सर्व मी माझ्या खिडकीतून पाहतो.