STORYMIRROR

Rahul Kulkarni

Children

3  

Rahul Kulkarni

Children

लहानपण

लहानपण

1 min
213

असे वाटते फिरून यावे पुन्हा एकदा लहानपण 

नकोनकोसे, झाले आता, तारूण्याचे शहाणपण 


तीच काकवी चिंचा बोरे लपाछपी अन् पारंब्या 

सत्याचीही, स्वप्ने झाली, नाही उरले उनाडपण 


कट्टी बट्टी, रुसवा फुगवा, राग बिलोरी नाकावर 

क्षणात एका जहालपण क्षणात एका मवाळपण 


पैसा-स्वप्ने, दुःख आसवे, नव्हती चिंता, कुणासही 

निवांत होत्या रात्री साऱ्या रम्य व्हायची सकाळपण 


सुटली शाळा तुटले दप्तर कोरी झाली पाटी अन्

हिरव्या हिरव्या बागेमध्ये उरले केवळ बकालपण


Rate this content
Log in

More marathi poem from Rahul Kulkarni

Similar marathi poem from Children