STORYMIRROR

Rahul Kulkarni

Others

3  

Rahul Kulkarni

Others

शेवटी

शेवटी

1 min
422


शांतताही खायला उठणार आहे शेवटी

प्रेयसी माझी म्हणे रडणार आहे शेवटी


फक्त कळसाच्या नको गर्वात राहू एवढा

सुप्त त्याची पायरी खचणार आहे शेवटी


हा दिलासा घेऊनी अंधार आहे जागला

वातही पणतीतली विझणार आहे शेवटी


खेळण्यापूर्वीच केला सामना घोषीत की

जिंदगी मरणा पुढे हरणार आहे शेवटी !


स्वप्न, गाडी,बंगला, शेती, हिरे, पैसा तुझा 

आठवण सोडुन तुझी उरणार आहे शेवटी


केवढी आहे चुरस त्यांच्यात येथे लागली

कोणते जाते मला दळणार आहे शेवटी?


फक्त बाभळ कोरडी वा तूप चंदन गोवऱ्या

जी दिली ती आहुती जळणार आहे शेवटी


Rate this content
Log in

More marathi poem from Rahul Kulkarni